मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने मेट्रो-३ च्या बांधकाम प्रकल्पात तब्बल ६७९ झाडे वाचवली. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या ३७७२ झाडांना कापण्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली होती, तरी मेट्रो कॉर्पोरेशनने केवळ ३०९३ झाडे काढली असून ६७९ झाडे मूळ जागेवर कायम ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कापलेल्या झाडांच्या पुनर्गोपणासाठी मुंबई मेट्रो ने प्रत्येक झाडामागे ४१ हजार रुपये खर्च केल्याची ही माहिती समोर येत आहे.
उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन करून, एमएमआरसीने (MMRC) एकूण २९३१ झाडे मेट्रो-३ स्थानकाजवळ (इन-सिटू) लावण्यास १२ कोटी रुपये कंत्राट दिलेले आहे. इन-सीटू वृक्षारोपणाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरसीद्वारे तीन कंत्राट देण्यात आले आहेत. या वृक्षारोपण प्रक्रियेत ३ टप्प्यांचा समावेश आहे; पहिल्या टप्प्यात रोपवाटिकांमध्ये (क्षेत्र २ हेक्टर) निर्धारित कालावधीत ४६ सें. मी. परिघापर्यंत झाडांची वाढ करणे, दुसऱ्या टप्प्यात, रोपवाटिकांमधून या आकाराच्या झाडांचे मुंबईतील विशिष्ट ठिकाणी स्थलांतरण करून निर्धारित स्थानकांच्या जागी त्यांचे रोपण करणे याचा समावेश होतो. आणि तिसऱ्या टप्प्यात वृक्षारोपणा नंतर ३ वर्षे देखभाल यांचा समावेश होतो. याप्रक्रियेदरम्यान जर झाडे मृत पावल्यास त्या बदल्यात झाडे लावून देणे हेही कंत्राटदाराला बंधनकारक आहे.
(हेही वाचा – Arvind Kejriwal: सुप्रीम कोर्टाने केजरीवालांचा अंतरिम जामीन अर्ज पुन्हा फेटाळला)
इन-सीटू वृक्षारोपण हा एक अनोखा प्रयत्न
प्रकल्पात बाधित या २९३१ झाडांसाठी ३ निविदांची एकूण मंजूर केली, त्याची किंमत १२ कोटी ०१ लाख ६६ हजार १३६ रुपये एवढी होती, त्यामुळे प्रति झाड सरासरी खर्च हा सुमारे रु. ४१,००० रुपये इतका होतो. इन-सीटू वृक्षारोपण हा एक अनोखा प्रयत्न आहे. ज्यामध्ये कंत्राटदाराला झाडाची प्रजाती ४५ सेमी परिघापर्यंत पोहोचेपर्यंत वृक्ष वाढवावे लागतात. नंतर विशिष्ट ठिकाणी वृक्षारोपण करावे लागते. आणि पुढे त्याची देखभाल करावी लागते म्हणून पारंपरिक वृक्षारोपणासाठी निर्धारित दराची इन-सीटू वृक्षारोपणाशी तुलना करता येत नाही.
भारतात प्रथमच कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाडे वाढवली गेली आणि इतर ठिकाणी लावली गेली आहेत. इन-सीटू वृक्षारोपण अंतर्गत एमएमआरसी (MMRC) ने १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत स्थानकांच्या ठिकाणी ६८३ झाडे लावली आहेत आणि वेळोवेळी उच्च न्यायालय नियुक्त समिती द्वारे या वृक्षारोपणाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. असे मुंबई मेट्रो ने स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community