MMRDA : मुंबईतील १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये करार

वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी

251
MMRDA : मुंबईतील १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये करार
MMRDA : मुंबईतील १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये करार

घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) (MMRDA) आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) (SRM) यांच्यात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत मंगळवारी संयुक्त करार करण्यात आला. (MMRDA) या करारामुळे  पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्गाच्या  दरम्यान असलेल्या सुमारे दोन हजार  झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असल्याने हा  रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. (MMRDA)

(हेही वाचा- Andheri-Ghatkopar : अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामातील अडथळा दूर)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली  आज मंत्रालयात एमएमआरडीएची (MMRDA) बैठक पार पडली. या बैठकीत अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक- खासगी -भागीदारी तत्वावर करण्यास  शिंदे यांनी यावेळी मान्यता दिली. तसेच  मुंबई महापालिकेप्रमाणेच (Municipal Corporation) एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला  चालना मिळावी यासाठी मुंबई , ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको आणि  म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यातील करारानुसार  माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’ (MMRDA) च्या माध्यमातून करण्यात आहे.

(हेही वाचा- Ratnagiri: शहरात दर सोमवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार)

वांद्रे ते कुर्ला रेल्वे  स्थानकादरम्यान वांद्रे – कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून त्याची लांबी ८.८० किमी  एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे.  या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

झोपडपट्टी मुक्त ठाणे

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवेच्या  मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास आणि  सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा- Amit Shah : महाराष्ट्र ५० वर्षांपासून शरद पवारांचं ओझं वाहतोय; अमित शाह यांची महाविकास आघाडीवर सडकून टीका)

या बैठकीत  बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत  ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता  देण्यात आली.  ‘एमएमआरडीए’ (MMRDA) मार्फत विशेष प्रयोजन वाहन कंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याद्वारे  सल्लागाराची कामे हाती घेण्यास आणि  व्यवसाय विकास कक्षाची स्थापना करण्यास देखील मंजुरी  देण्यात आली.

या बैठकीला  राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एमएमआरडीएचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, इंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफ, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.