MMRDA-BMC : एमएमआरडीएचे उर्वरीत पैसे देण्यासाठी नगरविकास खात्याचा महापालिकेवर दबाव; आतापर्यंत दिले २ हजार कोटी रुपये

990
MMRDA-BMC : एमएमआरडीएचे उर्वरीत पैसे देण्यासाठी नगरविकास खात्याचा महापालिकेवर दबाव; आतापर्यंत दिले २ हजार कोटी रुपये
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईत एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याने या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा मोबदला आता मुंबई महापालिकेकडून वसूल केला जात आहे. एम.एम.आर.डी.ए. ने, सुमारे ५००० कोटींच्या आर्थिक मोबदल्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. एम.एम.आर.डी.ए. ची ही मागणी मान्य करत महापालिका प्रशासनाने आता पर्यंत दोन हजार कोटी रुपये तातडीने दिले असून आता उर्वरीत रक्कम मिळवण्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून महापालिकेवर दबावतंत्र सुरु असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ३९०० कोटी रुपयांची तरतूद असली तरी सध्या तरी ही रक्कम देता येणार नाही, असेच त्यांना महापालिकेच्यावतीने पत्राद्वारे कळवले असल्याची माहिती मिळत आहे. (MMRDA-BMC)

एमएमआरडीएला आता २ हजार कोटी रुपये केले अदा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून मुंबईत मेट्रो रेल्वेची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई मेट्रो ३ प्रकल्प वगळता अन्य सर्व मेट्रो रेल्वेची कामे ही ‘एम.एम.आर.डी.ए.’च्यावतीने सुरू आहेत. मेट्रो रेल्वे सुविधा ही मुंबईकरांसाठी असून मुंबईकरांना मिळणाऱ्या या सेवेकरता यावर केलेला खर्चांचा २५ टक्के हिस्सा स्थानिक स्वराज संस्था म्हणून महापालिकेने पेलावा म्हणून ‘एम.एम.आर.डी.ए.’ ने महापालिकेला मागील महिन्यात पत्र पाठवून सुमारे ५ हजार कोटी रुपयांची आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली होती त्यानुसार महापालिकेने ‘एम.एम.आर.डी.ए.’ला तातडीने एक हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेत मागील अर्थसंकल्पातून मार्च महिन्यात सुमारे १ हजार कोटी रुपयांची रक्कम प्राधिकरणाला अदा केली. (MMRDA-BMC)

(हेही वाचा – Dadar-Mahim विधानसभा मतदारसंघात उबाठाचे ठरले; हाच असेल उमेदवार!)

यापूर्वी बँकेतील एफडी मोडून दिले होते पैसे

विशेष म्हणजे एमएमआरडीएला ही रक्कम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुदत ठेव असलेल्या एका मुदतठेवीपैंकी ९५० कोटी रुपयांची एक मुदतठेवीची रक्कम मुदतीपूर्वीच मोडली आणि त्यातून हा पैसा मार्च महिन्यात एमएमआरडीला दिला होता. त्यानंतर उर्वरीत ३९०० कोटी रुपयांची तरतूद सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये आणखी १ हजार कोटी रुपयांची रक्कम एमएमआरडीएला अदा करण्यात आली. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूद केलेल्या रकमेपैंकी उर्वरीत २९०० कोटी रुपयांची रक्कम एमएमआरडीएला देण्यासाठी आता नगर विकास खात्याच्या माध्यातून महापालिकेला पत्रव्यवहार केला जात असून ही रक्कम त्वरीत देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, यापूवीचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दोन हजार कोटी रुपये दोन महिन्यांमध्ये देऊन टाकले होते. परंतु विद्ममान महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, सध्या तरी तातडीने ही रक्कम देता येणार नाही असे नगरविकास खात्याला कळवल्याची माहिती मिळत आहे. (MMRDA-BMC)

एमएमआरडीच्या ताब्यातील प्रकल्पांवर महापालिकेचा असाही होणार खर्च

एका बाजुला एका बाजुला एमएमआरडीने वाट लावलेल्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डेमुक्तीसाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, शिवाय आता एक्सेस कंट्रोलच्या नावाखाली सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च केले जात आहे. शिवाय एमएमआरडीएने न केलेल्या परंतु महापालिकेच्या माथी मारलेल्या दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गाच्या कामांसाठी सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे मुंबईच्या हद्दीबाहेरील कामे ही महापालिकेच्या माथी मारली जात असतानाच आता एमएमआरडीएने मेट्रोची सेवा दिली म्हणून महापालिकेच्या तिजोरीत हात घालून सुमारे पाच हजार कोटींची उधळण केली जात असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांच्या उरात आणखी धडकी भरली आहे. (MMRDA-BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.