MMRDA : एमएमआरडीएने भरले मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे

161
MMRDA : एमएमआरडीएने भरले मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांच्या सुधरणा करत आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), शिवडी – वरळी कनेक्टर, ऐरोली कटाई नाका प्रकल्प, छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, एस सी एल आर विस्तार, तसेच विस्तारित MUIP अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिकांच्या हद्दीतील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्याची जबाबदारी यांचा समावेश आहे.

एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील खड्डे तत्परतेने भरले

एमएमआरडीएच्या (MMRDA) टीमने निर्माणाधिन असलेल्या प्रकल्पांतर्गत २ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण २७८३ खड्ड्यांची नोंद केली असून त्यातील २३७८ खड्डे भरले आहेत. त्यामध्ये १४६७ खड्डे हे रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ११२ किमी लांबीच्या भागातले असून त्यापैकी १३७३ खड्डे भरण्यात आले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पांच्या अखत्यारीत येणाऱ्या १०० किमी रस्त्यांवर आतापर्यंत १३१६ खड्ड्यांची नोंद झाली असून त्यापैकी १००५ खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्ते प्रकल्पांतर्गत ९४ आणि मेट्रो प्रकल्पांतर्गत उर्वरित ३११ खड्डे येत्या ४८ तासात बुझवण्यात येतील.

एमएमआरडीएमार्फत (MMRDA ) प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांलगत असणाऱ्या सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरीत प्रतिसाद पथकाद्वारे (quick response team) तात्काळ भरले जात आहेत.

New Project 2023 08 04T152126.136

 

(हेही वाचा – ‘या’ दिवशी मुंबई पालिकेतील पालकमंत्री कार्यालय बंद होणार)

एमएमआरडीएचे अविरत काम सुरू

एमएमआरडीएची (MMRDA) टीम मुसळधार पाऊस, वाहनांची सततची रहदारी यासह विविध आव्हानांचा सामना करत सर्व खड्डे तत्परतेने भरत आहे. मॅस्टिक अस्फाल्टची उपलब्धता हे देखील आव्हानच आहे, कारण त्याचे बंधन टिकवून ठेवण्यासाठी २०० °C इतकं उच्च तापमान राखणे आवश्यकता असते मात्र सततच्या पावसामुळे हे तापमान राखणे कठीण जात होते. हवामान खात्याच्या अहवालानुसार, या मान्सून मध्ये मुंबईत सरासरी २३१८.८० मिमी पाऊस पडला. तर फक्त जुलै महिन्यात ३१ जुलै २०२३ पर्यंत १७६९.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून ती जुलै २०२० च्या तुलनेत ८५५.७ मिमी अधिक आहे. या मान्सून मध्ये शहरात लक्षणीय पाऊस झाला असला तरीही नागरिकांना त्रास होऊ नये याची खात्री करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएची टीम चोवीस तास काम करत आहे.

New Project 2023 08 04T152317.346

एमएमआरडीएचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, (भारतीय प्रशासन सेवा) यांनी सांगितले की, “एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा विकसित करताना सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार मुंबईत मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे एमएमआरडीए राबवित असलेल्या प्रकल्पालगत अनेक ठिकाणी पाणी साचाणे तसेच खड्डे पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व तक्रारींबाबत प्राधिकरणाच्या टीमने नियंत्रण कक्षाद्वारे सर्वांशी समन्वय साधून या तक्रारींचे तत्काळ निरसन केले. मुसळधार पावसासह आव्हानात्मक वातावरणीय परिस्थितीतही एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर असून नागरिकांना दैनंदिन जीवनात कमीत कमी त्रास होईल याची आम्ही दक्षता घेत आहोत.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.