Marathi Rajbhasha Din निमित्त मनसेचा उपक्रम; पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा

वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी आई वडिलांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रंथ तुमच्या दारी यांसारखे उपक्रम राबविले गेले पाहिजे असे आवाहन अभिनेते सुनील बर्वे यांनी केले.

192
Marathi Rajbhasha Din निमित्त मनसेचा उपक्रम; पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा

वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते याच उद्देशाने मराठी भाषा दिनाच्या (Marathi Rajbhasha Din) निमित्ताने वाचकांसाठी ५० नामवंत प्रकाशकांची ५० हजारांहून अधिक पुस्तकांचा ठेवा पुस्तक प्रेमी व वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून घेता येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान येथील स्व. मीनाताई ठाकरे स्मारकाजवळ मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तर मराठी संवर्धन मंडळाचे देखील सहकार्य मिळाले. (Marathi Rajbhasha Din)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, आयोजक यशवंत किल्लेदार, मॅजेस्टिक बुक डेपोचे अक्षय कोठावळे व पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Rajbhasha Din) आयोजित केलेल्या पुस्तकं प्रदर्शनात बुक न्याहाळून राज ठाकरे यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. (Marathi Rajbhasha Din)

(हेही वाचा – Narendra Modi: ‘हे’ आहेत भारताच्या गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर, पंतप्रधानांकडून नावे जाहीर)

‘ग्रंथ तुमच्या दारी’ यांसारखे उपक्रम राबविले गेले पाहिजे – सुनील बर्वे 

ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी यावेळी सुंदर आशा कवितेचे सादरीकरण केले. तर वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी आई वडिलांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ यांसारखे उपक्रम राबविले गेले पाहिजे असे आवाहन अभिनेते सुनील बर्वे यांनी केले. (Marathi Rajbhasha Din)

कथा, कादंबरी ते विविध साहित्य, कार्टून चरित्र अशी ५०० हुन अधिक लेखकांनी लिहिलेली वाचनीय पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली असून वाचकांना ही पुस्तके १५-२० टक्के सवलतीत घेता येतील. वाचकांसाठी हे प्रदर्शन रविवार दिनांक ३ मार्च या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहता येईल. यशवंत किल्लेदार-उपाध्यक्ष, मनसे :- सन २००८ पासून मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Rajbhasha Din) ग्रंथ दिंडी, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त राबविण्यास मनसेने (MNS) पहिली सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून यावर्षीही पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Marathi Rajbhasha Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.