सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी राकेश मौर्या लेबर युनियनच्या छळवणुकीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर स्वरूपात दखल घेतली आहे. यापुढे जर कुणी सेटवर जाऊन कोणत्याही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी त्रास दिला, तर त्यांनी मनसेला येऊन सांगावे, मनसे त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, अशी थेट धमकी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली.
राकेश मौर्याची अनेक वर्षांपासून दादागिरी!
राजू सापते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्या हा आपल्याला त्रास देत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मला काम करणे शक्य नाही. याचाच निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे राजू सापते यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते. हाच धागा पकडत अमेय खोपकर यांनी मनोरंजन क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अमेय खोपकर यांनी केले.
(हेही वाचा : पोलिसाने न्यायालयालाच घातला गंडा! २१ लाख रुपये दंडाची रक्कम लाटली!)
काय म्हणाले राजू सापते?
राजू सापते हा कला दिग्दर्शक होता, कला दिग्दर्शक अजित दांडेकर आणि नंदू दांडेकर यांचा तो भाचा होता. अधिकारी ब्रदर्सच्या सुरुवातीच्या मालिकांमधून त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले आणि कालांतराने मालिका व चित्रपटाचे त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम सुरु केले. मुंबईत चारकोप भागात ते राहायचे आणि मराठी मालिकांमध्ये त्यांचे चांगले नाव होते. राजू सापते यांनी अत्म्हत्यापूर्वही व्हिडीओ बनवला, त्यात ते म्हणाले कि, नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचे पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेले आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत. हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितले की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेले नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचेही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातले एक प्रोजेक्ट झीचे मला सोडून द्यावं लाग. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचे काम सुरु असताना त्यांनी ते थांबव आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.
Join Our WhatsApp Community