MNS : मराठी पाट्यांसाठी मनसेचा गुजरातीवर हल्ला

मनसेने यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट करून प्रश्न विचारला आहे

166
MNS : मराठी पाट्यांसाठी मनसेचा गुजरातीवर हल्ला
MNS : मराठी पाट्यांसाठी मनसेचा गुजरातीवर हल्ला

गुजराती पाट्या, मराठी भाषिक यामध्ये आधीच मुंबईमध्ये वाद सुरू असताना एका गुजराती भाषेतील जाहिरातीवरून झालेला वाद चर्चेत आला आहे. या वादावरून मनसे (MNS) आक्रमक झाली आहे.

एअरटेलने  गुजराती (Gujarat) भाषेत जाहिरात दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मालाडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) गुजराती भाषेत जाहिराती करता, गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिराती (Marathi boards ) करणार का ? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. मनसेचे विद्यार्थी संघटनेचे नेत अखिल चित्रे, सतीश नारकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी मालाड पश्चिमकडे भारती एअरटेल कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी एअरटेल (Airtel) कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा आग्रह धरला. मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माफी मागण्यास सांगून गुजराती भाषेतील जाहिरात काढून टाकण्याची मागणी केली.

(हेही वाचा  – Financial Fraud : फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे मिटिंग पॉईंट ठरत आहे मंत्रालय, विधानभवन परिसर)

मनसेने यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट ( posting on Twitter) करून प्रश्न विचारला आहे की, महाराष्ट्रात हे मुद्दामून सुरू आहे का? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावे, हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो? स्वत: दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का?

याबाबत मनसेचे अखिल चित्रे म्हणाले की, गुजराती भाषेतील बिल, जाहिरात यामुळे सातत्याने गुजराती भाषा लादली जाते. गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिरात देणार का ? मनसेने याबाबत मोर्चा काढल्यानंतर एअरटेलकडून माफीनामा देण्यात आला आहे तसेच गुजराती भाषेतील जाहिरात त्यांनी बंद करण्याची खात्रीही दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.