MNS : दक्षिण मुंबईची जागा मनसेला का नको, वाचा…

अमित ठाकरे हे खासदार झाल्यास त्यांच्या मनसे पक्षाकडे दुर्लक्ष होईल. स्थानिक राजकारणात त्यांच्या वावर कमी होईल, याच भीतीने राज ठाकरे यांनी अमित यांना राजकारणात खासदार म्हणून निवडणुकीत न उचलण्याचा निर्धार पक्का केला असल्याचे बोलले जात आहे.

347
मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवली ते ठीक, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक; वक्फ बोर्डाच्या निधीवरून MNS ची टोलेबाजी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हा पक्ष शिवसेना-भाजपा यांच्यासोबत युती करणार अशा प्रकारची चर्चा असली तरी मनसे या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आता कमी झाली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मनसेला सोडण्यावर भाजपामध्ये एकमत झाले असले तरी या मतदारसंघात उमेदवार देण्याच्या मुद्द्यावरून मात्र भाजपामध्ये एकमत होऊ शकलेले नाही. दक्षिण मुंबईतून मनसेच्या वतीने पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आहे. पण या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना निवडून आणू अशा प्रकारची भूमिका भाजपाने घेतल्याने या निवडणुकीत मनसेने आपला उमेदवार न देण्याचा निर्धार पक्का केल्याची माहिती मिळत आहे. (MNS)

मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबई हे तीन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याने यातील दक्षिण मुंबई मतदार संघ मनसे सोबत आल्यास त्यांच्यासाठी सोडला जाईल अशा प्रकारची भूमिका भाजपाने घेतली होती. आणि या मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे मनसे युतीत सहभागी होईल, अशी चर्चा असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेने मात्र आपली सकारात्मक चर्चा झालेली असून अजून एकदा बैठक होईल असे माध्यमांना सांगून स्वतःची सुटका करून घेतली होती. (MNS)

(हेही वाचा – Vaishali Darekar: श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक होणार ? काय म्हणाल्या वैशाली दरेकर)

राज ठाकरेंना ही भीती 

परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाने बाळा नांदगावकर यांच्या ऐवजी अमित ठाकरे यांचे नाव सुचवले. अमित ठाकरे या निवडणुकीत उतरल्यास ते शंभर टक्के विजयी होतील. त्यांच्यासाठी भाजपाच्या एकूण एक कार्यकर्ता तसेच शिवसैनिक आणि मनसैनिक हे जोशात काम करतील. आणि सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून येतील, अशा प्रकारची रणनीती राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली होती. पण आपल्या मुलाला राजकारणात आणल्यानंतर राज ठाकरे यांना मुलाला दिल्लीत पाठवायचं नसून त्यांना स्थानिक राजकारणात सक्रिय करून पक्षाला अधिक मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे खासदार झाल्यास त्यांच्या मनसे पक्षाकडे दुर्लक्ष होईल. स्थानिक राजकारणात त्यांच्या वावर कमी होईल, याच भीतीने राज ठाकरे यांनी अमित यांना राजकारणात खासदार म्हणून निवडणुकीत न उचलण्याचा निर्धार पक्का केला असल्याचे बोलले जात आहे. (MNS)

अमित ठाकरे यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून आमदार बनवण्याचा मनसे अध्यक्षांचा निर्धार आहे. त्यामुळे भाजपकडून आलेल्या अमित ठाकरे यांच्या नावाचा विचार ठाकरे यांनी बाजूला करून या ठिकाणी जर आपण बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देत असाल तर ठीक, नाहीतर इथेच थांबवूया, अशा प्रकारची भूमिका त्यांनी भाजपाकडे मांडली. त्यामुळे या निवडणुकीत मनसेचा उमेदवार उतरणार नाही. त्यामुळेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडून त्या ठिकाणी राज्यसभेवर पाठवण्यात आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी देत त्यांना या निवडणुकीत उतरवण्याचा विचार सुरू असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.