MNS Drug Free Pune Camp : ड्रग्ज मुक्त पुण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनजागृती अभियान

मनसेकडून पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील गोपाळकृष्ण गोखले चौकात ड्रग्ज मुक्त पुणे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधताना निरोगी सुदृढ मन आणि सुदृढ शरीर ठेवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला पुणेकरांना दिला.

216
MNS Drug Free Pune Camp : ड्रग्ज मुक्त पुण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनजागृती अभियान

ऐतिहासिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात व्यसनाधीनतेचा प्रश्न निर्माण होत असताना व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Drug Free Pune Camp) वतीने शनिवार १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील गोपाळकृष्ण गोखले चौकात ड्रग्ज मुक्त पुणे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

सुदृढ मन आणि सुदृढ शरीर ठेवण्यासाठी

या कार्यक्रमास मनसे (MNS Drug Free Pune Camp) नेते बाबू वागस्कर, प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे, गणेश सातपुते, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिला शहराध्यक्षा वनिता वागस्कर, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, शहर सचिव रवि सहाने, नरेंद्र तांबोळी, परिक्षित शिरोळे यांच्यासह मनसे पक्षाचे विविध पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधताना निरोगी सुदृढ मन आणि सुदृढ शरीर ठेवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला पुणेकरांना दिला.

(हेही वाचा – Sam Manekshaw : १९७१च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सॅम माणेकशॉ यांचा काँग्रेसने थांबवला होता ३० वर्षे पगार)

व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे

ऐतिहासिक तसेच साहित्यिक वारसा असलेल्या पुणे शहरात वाढलेल्या व्यसनाधीनतेचा (MNS Drug Free Pune Camp) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वैभवशाली सांस्कृतिक पुण्याची ओळख जपण्यासाठी तसेच वाढत्या व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. या विचाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ड्रग्ज मुक्त पुणे जनजागृती अभियान चळवळ सकारात्मक ठरेल अशी भावना रणजित शिरोळे यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप ३ अर्थव्यवस्था बनणार)

पुणे पोलिस नार्कोटिक्स शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

पुणे पोलिस नार्कोटिक्स (MNS Drug Free Pune Camp) शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ड्रग्ज मुक्त पुणे (MNS Drug Free Pune Camp) जनजागृतीचा संदेश देणारे विविध फलक तसेच कॅन्डल मार्चच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. या अभियानात युवा स्पंदन सामाजिक संघटना तसेच युवकांनी सहभाग नोंदवला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.