मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेचा पोलिसांना ७ दिवसांचा अल्टिमेटम

नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मशिदीवरील भोंग्यांविरोधात पुन्हा सक्रिय झाली आहे. या मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसेने नाशिक पोलिसांना ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. गणेशोत्सव काळात मशिदींवरील भोंग्याचे आवाज वाढवण्यात आला आहे.

गणेशोत्सवात भोंग्यांचा प्रचंड आवाज वाढवला

गेल्या महिनाभरापासून मशिदीवरील भोंग्यांचा आवाज वाढल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गणेशोत्सवात भोंग्यांचा प्रचंड आवाज वाढवला होता, त्यामुळे आम्ही नाशिक पोलिसांना मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत हे भोंगे हटवावेत, याआधीही मनसेने यासाठी आंदोलन केले होते, आता पुन्हा मनसे यावर आंदोलन करणार आहे, यावेळीचे आंदोलन अधिक तीव्र असेल, असे नाशिक मनसेचे म्हणणे आहे.

(हेही वाचा वेदांताचा दुसराही प्रकल्प, महाराष्ट्राचा विचार – अनिल अग्रवाल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here