MNS : महायुती झाल्यास मनसेला फायदा, पण मतदार पाठिशी किती हे कसे ठरवणार?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीसोबत मनसेही सहभागी होऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

201
दक्षिण मुंबईत MNS ची मते ठरणार निर्णायक, मनसैनिकांचाही प्रचारात जोर
विशेष प्रतिनिधी,मुंबई

भाजपासोबत मनसेच्या (MNS) युतीची आता सकारात्मक चर्चा आता पार पडली असून आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला दोन जागा सोडल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मनसे सोबत आल्याने याचा आता निश्चितच फायदा भाजपा (BJP) आणि शिवसेना युतीला आणि पर्यायाने मनसेला होणार आहे. मात्र, महायुतीत मनसे (MNS) सहभागी झाली असली तरी प्रत्यक्षात मनसेचे निश्चित मतदार किती याचा आकडाच पक्षाकडे नसून आगामी विधानसभा व महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतांचा टक्का निश्चित करण्यासाठी मनसेने स्वतंत्र निवडणूक लढवावी अशाप्रकारच्या भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीसोबत मनसेही सहभागी होऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये महायुतीची चर्चा जोरात सुरु झाली. यामध्ये दक्षिण मुंबई आणि नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा सोडल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – BMC : प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची मागणी वाढली, कुलाब्यातील नेव्ही, आर्मीच्या संरक्षण विभागांना आणखी साडेतीन दशलक्ष लिटरचा पुरवठा)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा असून नांदगावकर यांनी इंजिन ऐवजी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशाप्रकारचा दबाव मनसेवर (MNS) आल्याचे बोलले जात आहे. परंतु आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही भेट सकारात्मक झाली असून लवकरच आणखी एक बैठक पार पडेल असे मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नाशिक शिवाय अन्य कोणत्या मतदार संघांचा पर्याय आहे का किंवा अन्य मतदार संघाचीही मागणी केली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु महायुतीत सामील झाल्यास याचा फायदा महायुतीतील घटक पक्षांना होणार आहे. मनसेलाही (MNS) याचा फायदा होईल आणि मनसेचे खासदार निवडणूक येण्यास मदत होईल. मनसेचे खासदार निवडून येतील आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंब देतील अशी घोषणा त्यांनी सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दिली होती. परंतु मनसेचे (MNS) खासदार काही निवडून आले नव्हते. त्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे (MNS) उमेदवारच उभे केले नव्हते. याचा फटका मनसेला विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीत बसला. त्यामुळे मनसेकडे (MNS) सध्या आपला निव्वळ मतदार किती आहे याचीच आकडेवारी नाही. त्यामुळे मनसेचा पक्का मतदार किती आहे हे जाणून घेण्यासाठी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवावी अशाप्रकारची भूमिका पक्षाचे कार्यकर्ते मांडत आहेत. त्यामुळे पक्षाचे खासदार म्हणून खाते उघडणार की आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून स्वतंत्र लढण्याचा निर्णय मनसे घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. काळानुरुप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी होऊन खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महायुती पुढेही राहिल्यास मनसेला (MNS) अधिक सक्षम बनवता येईल असाही विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे काही गट हा स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या दृष्टीकोनातून विचार करणार आहे तर काही गट हा महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे राज ठाकरे कुठे तडजोड करतात आणि महायुतीत सामील होण्याची घोषणा करतात की समाधान न झाल्याने स्वतंत्र लढण्याचा निर्धार करता याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.