मुंबई – गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसे आक्रमक मागणी करत आहे. रविवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी रायगड जिल्ह्यातील पळस्पे, तरणखोप (पेण), रत्नागिरी आदी ८ ठिकाणाहून मनसेची जागरयात्रा आरंभ झाली आहे. मनसेचे युवा नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. मनसेचे अनेक नेते या जागरयात्रेत सहभागी झाले आहेत. कोलाड येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेने या जागरयात्रेची सांगता होणार आहे.
(हेही वाचा – Fast: उपवासाला साबुदाणा- बटाट्यापेक्षा खा रताळी; ‘हे’ आहेत ५ फायदे)
या पदयात्रेत पत्रकारांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. भारत चंद्रावर गेला, तरी मुंबई गोवा महामार्ग अजून पूर्ण झालेला नाही. गेली १७ वर्षे काम रखडले आहे. आताही खड्डे सध्या काँक्रीटने भारत आहेत. या रस्त्याने (Mumbai Goa Highway) आतापर्यंत २५०० लोकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे सरकारला लवकर जाग येण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढली आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. ‘आज शांततेत यात्रा काढली आहे, पुढची यात्रा शांततेत नसेल’, अशी चेतावणीही अमित ठाकरे यांनी सरकारला दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community