पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी घोषणा केली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि हरित क्रांतीचे जनक एस.एम. स्वामीनाथन यांच्या नावाचा समावेश आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनीही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या अद्वितीय नेत्याला ‘भारतरत्न’ हा सन्मान मिळायलाच हवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) भारतरत्न मिळाला, तर त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय, अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असे राज यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – Microsoft to Train Indian Women : मायक्रोसॉफ्ट कंपनी ७५,००० महिलांना देणार डेव्हलपिंगचं प्रशिक्षण)
या मागणीसंदर्भात राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस. स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त करून पुढे म्हटले आहे की, असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे, तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनादेखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.’ , अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024
अनेकांसाठी अत्यानंदाचा क्षण असेल…
‘देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.’, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community