सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले आहे. तर दोन महिन्याची मुदत २५ नोव्हेंबर रोजीचा संपली आहे असे नामफलक नसलेल्या दुकाने आणि आस्थापनांवर येत्या मंगळवार, २८ नोव्हेंबरपासून कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. (Mumbai News)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमधील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत. या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबरला संपली आहे. त्यासाठी २४ प्रशासकीय विभागस्तरावर दुकाने आणि आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार आणि सुविधाकारांचे पथक तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुकानदारांना पाट्या लावण्यासाठी तब्बल तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे . (Mumbai News)
अन्यथा मनसेला खळ्खट्याक आंदोलन करावे लागेल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांसदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे. तत्परतेने कारवाई होईल अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्ही आहोतच, असं त्यांनी यात म्हटलं आहे. कायदा हातात घेतात म्हणून महाराष्ट्र सैनिकांना केसेस टाकून छळलंत पण कायदा धाब्यावर बसविणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर काय कारवाई होते ते आता आम्ही पाहणार आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर मुदतीनंतर जर मराठीत पाट्या केल्या नाहीत तर मनसेला नाईलाजाने खळ्ळखट्याकचा वापर करावा लागेल, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.
हेही पहा –