संभाव्य पूर परिस्थितीसाठी नाशिकच्या रामकुंडावर रंगीत तालीम

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गोदाघाट येथील रामकुंडावर रंगीत तालीम घेण्यात आली.

152

नाशिकमधील गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने, गंगापूर धरणातून संभाव्य वाढणाऱ्या पाणी पातळीच्या अनुषंगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असतो. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या नागरिकांना सतर्क करुन, सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी मंगळवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गोदाघाट येथील रामकुंडावर रंगीत तालीम घेण्यात आली.

अशी झाली रंगीत तालीम

गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टीने होत असल्याने तात्काळ गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात एक लाख क्सुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणेला दिली व त्यानुसार सर्व यंत्रणांनी सतर्कता व तत्परता दाखवून रंगीत तालीम पार पाडली. यावेळी शोध व बचाव कार्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीची प्रात्यक्षिके करण्यात आली.

(हेही वाचाः मिठी नदीवरी पूल 5 महिन्यांत बांधून पूर्ण)

सर्व यंत्रणांनी दाखवली कार्यतत्परता

रंगीत तालमीच्या दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी करण्यात येणा-या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक बचाव पथकामार्फत दाखवण्यात आले. तसेच पोलिस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, शववाहिका, यांनी देखील वेळेत येऊन आपली कार्यतत्परता दाखवली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मार्गदर्शन करुन, रंगीत तालीम संपल्याचे जाहीर केले. रंगीत तालमीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांचे व स्वयंसेवकांचे श्रीमती मीना यांनी कौतुक केले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे उपस्थित होते.

(हेही वाचाः यंदा अशी होणार पायी वारी… आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.