मुंबईला पाणीपुरवठा करणारे Modak sagar धरणही भरले

3447
Modak Sagar Dam मधील गाळ सर्वेक्षण करण्याची जबाबदारी 'मेरी' वर
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तुळशी (Tulsi dam), तानसा  आणि विहार या तलावांपाठोपाठ आता मोडकसागर तलावही गुरुवारी  सकाळी १०.४० मिनिटांनी  ओसंडून भरुन वाहू लागले. त्यामुळे एकूण सात तलावांपैकी चार तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी खुशखबर असली तरी मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणी पुरवठा करणार्‍या भातसा धरणात  ६४ टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे. चार तलाव भरले असले तरी एकूण पाणी साठ्याच्या केवळ ६६ टक्केच पाणी साठा जमा झाला आहे. तरीही चिंता करण्याचे कारण नसून अशाच प्रकारे १ ऑक्टोबर पर्यंत साडे चौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा होईल आणि मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवता येईल असा अंदाज  जल अभियंता विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Modaksagar Dam)
मागील आठ दिवसांपासून ठाणे तसेच, नाशिक भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी तानसा आणि गुरुवारी पहाटे  विहार तलाव भरले. त्यानंतर गुरुवारी सकाळीच १०.४० मिनिटांनी मोडक सागर तलावही भरले. दरवर्षी मोडक सागर तलाव प्रथम भरते आणि त्यानंतर तानसा तलाव भरले जाते. परंतु मागील वर्षी प्रमाणे तानसा धरण  पहिले भरले, त्यानंतर दुसर्‍या दिवशी मोडक सागर  धरण भरले गेले.  (Modaksagar Dam)
मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर (Modaksagar Dam), तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी (Tulsi dam) या सात  तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २५ जुलै २०२४रोजी यासर्व तलावांमध्ये ९ लाख ६६ हजार ३९५ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत  याच दिवशी मागील वर्षी  म्हणजे २०२३ रोजी याच दिवशी ५५.१८ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर २०२२ मध्ये या सर्व तलावांत ८९.०९ टक्के एवढा पाणीसाठा होता.  (Modaksagar Dam)
२५ जुलै पर्यंतचा पाणी साठा
 २०२४ : ९ लाख ६६ हजार ३९५ दशलक्ष लिटर्स
(६४.७७ टक्के )
२०२३ :  ७ लाख ९८ हजार ७०४ दशलक्ष लिटर्स  (५५.१८ टक्के)
२०२२:  १२लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर्स (८९.०९टक्के)
२०२१:   ९ लाख २७ हजार ३३५ दशलक्ष (६८.२२ टक्के)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.