मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरील वाहनांच्या वेगासह अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आयटीएमएस) जून महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. या अंतर्गत १०६ ठिकाणी २१८ आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या प्रणालीमुळे अति वेगाने वाहन चालविणे, मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणे सोपे होणार आहे. (Mumbai-Pune Expressway)
लोणावळ्याजवळ कुसगाव येथे एक नियंत्रण कक्ष आहे, जेथे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि महामार्ग गस्त सीसीटीव्हीचे निरीक्षण करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलान जारी करतील. सध्या आरटीओकडून दिवसा स्पीड गन असलेली एक किंवा दोन वाहने तैनात आहेत. (Mumbai-Pune Expressway)
(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Collapse : भुजबळ यांची वेगळी चूल?)
११ ठिकाणी बसविणार हवामान निरिक्षण यंत्रणा
हे कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) क्षमतेने सुसज्ज आहेत. या कॅमेरामध्ये १७ पेक्षा जास्त प्रकारांच्या वाहतुक नियमांचे उल्लंघन शोधण्यासाठी डिझाइन केले आहे. तसेच एक्सप्रेस वे वरील सर्व एण्ट्रामध्ये माल वाहतूक ट्रककरिता वेट-इन मशीन असणार आहेत. ११ ठिकाणी हवामान निरिक्षण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. टो व्हॅन, क्रेन आणि म्ब्युलन्ससह ३६ आपत्कालीन वाहने वाहन ट्रॅकिंग सिस्टमसह सुसज्ज असतील. याशिवाय या यंत्रणेमुळे एक्सप्रेस वे वरील वाहतुक, बंद रस्ते आणि हवामानाच्या माहितीसह रिअल-टाइम अपडेट प्रवाशांना मिळू शकते. (Mumbai-Pune Expressway)
इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबवली आहे. यात एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना एकात्मिक ऑप्टिकल फायबरद्वारे कॅमेरे जोडलेले आहेत. दर चार कि. मी. अंतरावर वेग तपासणारी यंत्रणा, मार्गिका जोडली आहे. पहिल्या टप्यासाठी एक्सप्रेस वे वर ९५ किलोमीटरपर्यंत ३९ गैंट्री उभारल्या आहेत. वेगमयदिवर नियंत्रण ठेवणारी विशेष प्रणाली कार्यान्वित केली आहे. (Mumbai-Pune Expressway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community