- ऋजुता लुकतुके
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे आता जवळ जवळ स्पष्ट आहे. नरेंद्र मोदींची या आघाडीच्या अध्यक्षपदी निवडही झाली आहे. मोदी (Modi 3.0) सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला तेव्हा सरकारने २०२५ पर्यंत देशात ३०० अब्ज अमेरिकन डॉलर (American Dollar) मूल्याची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं बनवण्याचं उद्दिष्टं ठेवलं होतं. आता तिसऱ्या मुदतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू हाच भारताचा प्राधान्यक्रम असेल का, याचा आढावा घेऊया. (Modi 3.0)
‘भारतीय जनमताचा कौल स्थिरता आणि सातत्याला मिळाला असल्याचं आम्ही मानतो. सातत्य म्हणजे जे आहे ते सुरू राहणं. आताच्या सरकारने आतापर्यंत राबवलेली धोरणं ही आर्थिक विकास आणि स्थैर्य यासाठी धार्जिणी होती. देशात पायाभूत सुविधांचा विकास झाला. आता पुढील पाच वर्ष भारत जगात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. येणारी ५ वर्षं ही सेमी कन्डक्टर, मायक्रोचिप (microchip), ड्रोन, मेडटेक (Medtech), स्पेसटेक यांची असतील. आणि भारत त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असं एचसीएल टेकचे सहसंस्थापक अजय चौधरी यांनी बोलून दाखवलं आहे. (Modi 3.0)
(हेही वाचा- ICC T20 Rankings : दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्येची आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत मुसंडी)
हे सांगताना त्यांनी सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेवर बोट ठेवलं. ‘मागची १० वर्षं देशातील उद्योजकांनी साधनांची जुळवाजुळव केली आहे. एका ध्येयासाठी ते एकत्र आले आहेत. आता भारताला आत्मनिर्भर बनवण्याची खरी वेळ आली आहे. आता भारतातच डिझायनिंग होऊ शकेल असा विश्वास उद्योग जगताला वाटत आहे,’ असं चौधरी म्हणाले. (Modi 3.0)
मोदी (Modi 3.0) सरकारच्या मागील कार्यकाळात ७६,००० कोटी रुपयांच्या मायक्रोचिप ऑर्डर भारतातील टाटा सन्स (Tata Sons), सीजी पॉवर आणि मायक्रॉन या कंपन्यांना मिळाल्या. देशातील डिक्सॉन इलेक्ट्रिकल्स ही कंपनी शिओमी फोनची भारतात जुळणी करते. भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर ४ जूनला डिक्सॉन कंपनीचा शेअर १० टक्क्यांच्या वर पडला होता. पण, आता पुढच्याच दिवशी तो ६ टक्क्यांनी वधारला. याचाच अर्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार येणार आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुंतवणूक होणार याचा विश्वास आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनाही वाटतोय. डिक्सॉन कंपनी भारतात गुगलचे पिक्सेल फोन तयार करण्यासाठीही उत्सुक आहे. (Modi 3.0)
(हेही वाचा- T20 World Cup 2024 : रोहित शर्माने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम)
‘मागच्या ५ वर्षांत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपन्यांना चांगल्या सवलती सरकारकडून मिळाल्या आहेत. पीएलआय योजनेचाही फायदा मिळाला आहे. त्यामुळे भारतात उत्पादन प्रक्रिया जलद झाली आहे. आता नवीन सरकरकडून हा प्रगतीचा वेग कायम राखला जाईल अशी आशा आहे,’ असं इंडिया इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर असोसिएशनचे प्रमुख अशोक चांडक यांनी निकालानंतर बोलून दाखवलं आहे. देशाचे माजी माहिती तंत्रज्जान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा आढावा घेताना भारतातून इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीचं केंद्राचं धोरण असेल असं वारंवार स्पष्ट केलं होतं. या उद्योगाला आता आशा आहे ती धोरणातील सातत्याची. (Modi 3.0)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community