गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या काळात कोकणाच जाणाऱ्या बस तसेच रेल्वे फुल्ल असतात. रेल्वे गाड्यांचे आरक्षण दोन महिने आधीत सुरू होते. म्हणूनच अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी दिनांक २८ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून ‘मोदी एक्स्प्रेस’ धावणार आहे. नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांच्या पुढाकाराने मुंबईतून कोकणसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्यात आली होती.
२८ ऑगस्टला ‘मोदी एक्स्प्रेस’
यंदाही भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस ही विशेष गाडी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीसाठी सुटणार आहे. भाविकांना घेऊन ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजपच्या मुंबई विभागाकडून उचलला जाणार असल्याची माहिती अॅड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
( हेही वाचा : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; ३० गावांचा संपर्क तुटला )
यासाठी मुंबईतील प्रत्येक मंडळामधून कोकणात जाणाऱ्या ५० प्रवाशांची नावे (नाव, वय तसेच मोबाइल क्रमांक या स्वरुपात) नोंदवायची आहे. यासाठी प्रत्येकी १०० रुपये नोंदणी शुल्क ठरवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community