‘प्लास्टिक स्ट्रॉ’वर केंद्राची बंदी, अमूलचा मात्र विरोध

केंद्र सरकारने १ जुलैपासून देशभरात ‘प्लास्टिक स्ट्रॉ’ वर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा देशातील दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे देशातील दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी अमूलने याला विरोध केला आहे.

प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दुधाच्या विक्रीत वाढ

या निर्णयानुसार पॅक्ड ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांसोबत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी येणार आहे. याविषयी अमूलने केंद्राला पत्र लिहिले आहे. प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती सरकारला केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा दूध उत्पादक शेतकरी आणि यासंबंधीत उत्पादनांच्या विक्रीवर होणार असल्याचे अमूल कंपनीने म्हटले आहे. अमूल कंपनीच्या आधी अनेक शीतपेय विक्रेत्या कंपन्यांनी केंद सरकारला प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घालू नये, अशी विनंती केली होती. मात्र सरकारने ही विनंती मान्य केली नाही. अमूल कंपनीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले आहे. पीएमओला लिहिलेल्या पत्रात अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी म्हणाले की, प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दुधाची विक्री वाढण्यास मदत होते.

(हेही वाचा भाजप विधानपरिषदेसाठीही आक्रमक, सहाव्या जागेसाठी सदाभाऊंना पाठिंबा)

10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल दिलासा

सरकारच्या या निर्णयामुळे अमूल, पेप्सिको आणि कोका-कोलासह अनेक शीतपेय कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. मात्र सरकारने आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आहे आणि कंपन्यांना पर्यायी स्ट्रॉचा वापर करण्यास सांगितले आहे. प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदीचा निर्णय काही दिवसांसाठी वाढवल्यास देशातील 10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here