जर तुमच्याकडे अशी संपत्ती आहे तर सरकार करणार कारवाई, काय आहे प्लॅन

150

मालमत्तेत करण्यात येणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेत होणारी गुंतवणूक वाढली असून, मालमत्तेच्या खरेदीसाठी लागणा-या किंमती देखील वाढल्या आहेत. पण आता काही मालमत्तांच्या बाबतीत केंद्र सरकार कठोर अॅक्शन घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शत्रूच्या संपत्तीवर जर कोणी कब्जा केले असेल तर अशा लोकांनी सतर्क राहण्याची गरज असून, मोदी सरकार देशातील शत्रू संपत्तीबाबत कठोर पावले उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे सरकारची मोहीम

जर आपल्या मालकीची असलेली एखादी संपत्ती ही शत्रूची असल्याचे लक्षात आल्यानंतर ती संपत्ती कब्जामुक्त करण्यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी सरकार घरे,दुकाने अथवा जागेचाही लिलाव करणार आहे. तसेच जर का शत्रू संपत्तीवर कब्जा करण्यात आला असेल तर सरकारकडून करण्यात येणा-या लिलावात संपत्ती खरेदी करण्याचा पहिला अधिकार त्याच व्यक्तीला देण्यात येईल, असाही पर्याय केंद्र सरकार देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः कोरोना लस घेतल्यावर साईड इफेक्ट झाल्यास जबाबदार कोण? केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिले उत्तर)

उत्तर प्रदेशात सर्वाधिक शत्रू संपत्ती

शत्रू संपत्ती अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील नोएडा आणि ग्रेटर नोएडापासून सुरू करण्यात येणार आहे. देशातील एकूण 12 हजार 615 शत्रू संपत्तीची ओळख पटली असून, सर्वात जास्त 6 हजार 255 शत्रू संपत्ती ही उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शत्रू संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे.

शत्रू संपत्ती म्हणजे काय?

भारताच्या फाळणीनंतर 1962,1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये ज्यांना भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित व्हावे लागले, त्यांच्या भारतातील संपत्तीला म्हणजेच घर,दुकान किंवा जमिनीला शत्रू संपत्ती असे म्हटले जाते. 1962 च्या संरक्षण कायद्यानुसार सरकारला शत्रूची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे.

(हेही वाचाः पुण्यातील दुचाकीस्वारांना पोलिसांचा इशारा, ‘हे’ करत असाल तर होणार कारवाई)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.