सध्या दिल्लीच्या वेशीवर हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत झालेल्या चर्चेत मोदी सरकारने ५ पिकांना एमएसपी अंतर्गत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले मात्र शेतकरी २५ पिकांचा यात समावेश करा, अशी मागणी करत आंदोलनावर ठाम राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ऊस उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. ऊस उत्पादकांना ८ टक्के FRP वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून हा एफआरपी लागू होणार आहे.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली. साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना ऊसाची किंमत योग्य आणि लाभदायक किंमत निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या ऊसाचा हंगामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४-२५ साठी ३४० रुपये प्रति क्विंटल किमत निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी ही किंमत ३१५ रुपये इतकी होती. यावेळी यामध्ये २५ रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. या नव्या धोरणाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. दरम्यान, भारत याआधी जगात सर्वाधिक ऊसासाठी सर्वाधिक किंमत मोजत आहेत, असे असतानाही देशात साखर सर्वात स्वस्त दिली जाते.
Join Our WhatsApp Community