दरमहा 210 गुंतवून 5 हजार रुपये देणा-या सरकारी पेन्शन योजनेत सरकारने केला मोठा बदल, नक्की जाणून घ्या

नोकरदार वर्गासाठी आपल्या भविष्याची तरतूद करुन ठेवणे फार महत्वाचे असते. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आपल्या भविष्यासाठी तरतूद करता यावी यासाठी केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली अटल पेन्शन योजना.

या योजनेत अनेक जण पैसे गुंतवून भविष्याची पुंजी जमा करत असतात. पण आता याच अटल पेन्शन योजनेत केंद्र सरकारकडून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

काय आहे नवा नियम?

आयकर भरणा-या करदात्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आयकर भरणारे करदाते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत. 1 नोव्हेंबर 2022 पासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जे आयकर करदाते या पेन्शन योजनेचा सध्या लाभ घेत आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करण्यात येतील, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः PMPML: पीएमपीएमएलच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी वीजच अपुरी, प्रवाशांमध्ये नाराजी)

असा मिळतो लाभ

वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील लोकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत दरमहा 210 रुपये गुंतवल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्यात येते. उशिरा हा योजना सुरु करणा-या नागरिकांना 60 व्या वर्षानंतर मिळणारा लाभ कमी असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here