Pension Scheme: विवाहित जोडप्याला मोदी सरकार दर महिन्याला देणार १८,५०० रुपये! पण ‘ही’ आहे अट

153

केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. मात्र आज तुम्हाला अशा एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये मोदी सरकार तुम्हाला दर महिन्याला पैसे देणार आहे. या योजनेचे नाव पीएम वय वंदना योजना असून (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) ज्यामध्ये तुम्हाला वृद्धापकाळात दर महिन्याला पैसे मिळणार आहे. तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ 31 मार्च 2023 पर्यंत घेऊ शकता.

(हेही वाचा – EPFO कडून नवी गाईडलाईन जारी; आता तुमचा क्लेम वारंवार रिजेक्ट होणार की नाही? जाणून घ्या…)

10 वर्षांनी परत मिळणार सर्व पैसे

सरकार नागरिकांसाठी अनेक पेन्शन योजना आणि गुंतवणूक योजना राबवत आहे, ज्याचा लाभ 60 वर्षांनंतर लोकांना विशिष्ट प्रमाणात मिळतो. तुम्हालाही तुमच्या भविष्यात पैशांच्या कमतरतेवर मात करायची असेल, तर तुम्ही अशाच एका योजनेत गुंतवणूक करू शकता. ही एक प्रकारची पेन्शन योजना असून ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतात. यामध्ये पती-पत्नीला दर महिन्याला 18 हजार 500 रुपये मिळतात.

सरकारच्या या पेन्शन योजनेंतर्गत निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 18 हजार 500 इतकी रक्कम दिली जाईल. ही योजना शासनामार्फत चालवली जाते, यामुळे यामध्ये कोणतेही नुकसान होत नाही आणि यामध्ये पती-पत्नी दोघेही पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय या योजनेंतर्गत 10 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह परत मिळतात.

18 हजार 500 रुपये मिळवायचे? ही आहे अट

या पेन्शन योजनेत एखाद्या पती-पत्नीने 15 लाखांची गुंतवणूक केली, म्हणजे एकूण 30 लाखांची गुंतवणूक केली, तर 7.40% दराने व्याजाचा लाभ मिळेल. या रकमेवर तुम्हाला व्याजातून 222000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. जर या व्याजाच्या रक्कमेला 12 महिन्यांनी भागले तर तुम्हाला दरमहा 18 हजार 500 रुपये मिळतील आणि ही रक्कम तुमच्या खात्यात पेन्शन म्हणून जमा होईल. या योजनेचा मॅच्युरिटी पिरिअड 10 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 10 वर्षांसाठी या योजनेत पैसे गुंतवू शकता. जर तुम्ही त्यात 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे 10 वर्षांनंतर परत मिळतील.

तुम्ही एकटेही घेऊ शकतात योजनेचा लाभ

जर फक्त एका व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करू शकता, ज्यावर तुम्हाला वार्षिक 111000 रुपये व्याज म्हणून मिळतील, म्हणजेच दरमहा 9 हजार 250 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.