मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील (Modi 3.0) पहिलाच अर्थसंकल्प २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री आहेत.
(हेही वाचा – Cm Eknath Shinde: सरकारच्या योजना घराघरात पोहोचवा, महायुतीचा विजय निश्चित: मुख्यमंत्री शिंदे)
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजुजू (Kiren Rijuju) यांनी यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
कोणी किती वेळा मांडला अर्थसंकल्प ?
सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. पी.चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी ९ वेळा, यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख आणि यशवंत सिन्हा यांनी ७, तर मनमोहन सिंग आणि टी. कृष्णमाचारी यांनी ६ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. (Nirmala Sitharaman)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community