स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या ५ शहरांमध्ये मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर येथे एकाच दिवशी आणि एकाच वेळी ‘सुंदर ‘मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ (Modi Lipi) आणि ‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ होणार आहेत. मोडी लिपी प्रचारार्थ आयोजित भव्य राज्यस्तरीय मोडीलिपी (Modi Lipi) स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. ही स्पर्धा १ मे २०२५ या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घेतली जाईल.
या स्पर्धेत (Modi Lipi) भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना २९ एप्रिलपर्यंत आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. सर्वच केंद्रावरील दोन्ही स्पर्धा गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेची ठिकाणे ही मुंबई, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर (संपर्क – राजेश खिलारी-९३२३०२२२२२/०२२-२४४६५८००), पुणे (संपर्क – परेश जोशी ९८८११०४२७९), अहिल्याबाई ऐतिहासिक संग्रहालय (संपर्क – संतोष यादव-९३७२१५५४५५), कोल्हापूर (संपर्क – नवीनकुमार माळी-९४२००३९४९४), आणि नाशिक (संपर्क – अरविंद साने-९८५०७४६१७२) अशी आहेत. प्रवेशपत्र हे केंद्रावरच भरावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची सुविधा नाही. दूर अंतरावर राहणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी येऊन प्रवेशपत्र भरू शकतील, पुस्तक विक्रेत्यांनाही मोडी विषयक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यास आवाहन करत आहोत.
या स्पर्धेत (Modi Lipi) सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वतःचे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोड रबर, फूट पट्टी आणि धरावयास पॅड आणावे. स्पर्धकांना कागद पुरवले जातील. काळ्या शाईचा वापर अनिवार्य आहे. सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल तो मोडी लिपीत (Modi Lipi) लिहावयाचा आहे. अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता १ शिवकालीन आणि १ पेशवेकालीन कागद असेल. या करिता प्रत्येकी एक तास दिला जाईल. पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. स्पर्धा निकाल प्रक्रियेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील. एका स्पर्धेचे सहभाग शुल्क १०० रुपये आहेत, दोन्ही स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना १५० शुल्क भरावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community