KEM Hospital मध्ये डोळ्यांचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आता महिन्याला करता येणार ३०० शस्त्रक्रिया

1149
KEM Hospital मध्ये डोळ्यांचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आता महिन्याला करता येणार ३०० शस्त्रक्रिया

मुंबईत डोळ्यांशी संबंधित उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत स्वरूपाची अशी सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाने (KEM Hospital) आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागात ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’च्या सुविधेची सुरूवात गुरुवारी (२२ ऑगस्ट २०२४) पासून करण्यात आली आहे. त्यामुळे या अद्ययावत उपकरणामुळे महिन्याला ३०० शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

(हेही वाचा – Zomato to Buy Paytm : झोमॅटो खरेदी करणार पेटीएमचा तिकीट विक्री व्यवसाय)

केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) नेत्र शल्यचिकित्सा विभागात ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’चे केईएम रुग्णालयातील नेत्र विभागाचे माजी विभागप्रमुख आणि प्राध्यापक डॉ. रूमी जहांगीर यांच्या हस्ते आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या उपस्थितीत या सुविधेची सुरुवात झाली. त्यामुळे अतिशय अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना यापुढील काळात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. केईएम रूग्णालयाच्या (KEM Hospital) मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये अद्ययावत उपकरणांसोबतच मॉड्युलर सेटिंग आणि लॅमिनर एअर फ्लो यासारख्या सुविधा आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मदत होणार आहे. नेत्र विभागामध्ये मोतिबिंदू (कॅटॅरॅक्ट), ग्लाऊकोमा, स्क्विंट, रेटिना, कॉरेना, लहान मुलांशी संबंधित डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात.

(हेही वाचा – Monkeypox : सेव्हन हिल्स रुग्णालय ‘या’ आजारांसाठीही सज्ज, १४ खाटांचा कक्ष आरक्षित)

केईएम रुग्णालयात (KEM Hospital) नेत्रविकाराकरीता उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत स्वरूपाच्या तसेच दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. तसेच नेत्रचिकित्सेशी संबंधित सुविधा अधिक गुणवत्तापूर्ण देताना रूग्णांची अधिक काळजी घेण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. रुग्णालयात (KEM Hospital) उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’मुळे शस्त्रक्रियांची प्रक्रिया अधिक सुकर आणि वेगाने होण्यासाठी मदत होणार आहे. आतापर्यंत नेत्र शल्यचिकित्सा विभागात महिन्याला सरासरी २२० शस्त्रक्रिया पार पडत होत्या. नव्याने अद्ययावत उपकरणामुळे महिन्याल ३०० शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, अशी माहिती नेत्र शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश इंगोले यांनी दिली. निर्जंतुकीकरणासाठी हाय स्पीड स्वरूपाची स्वयंचलित ऑटोक्लेव्ह संयंत्र देखील संयोग ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपकरणामुळे शस्त्रक्रियांची संख्या वाढतानाच रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी मदत होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.