टी-२० वर्ल्डकपसाठी BCCI ने घेतला मोठा निर्णय! बुमराहऐवजी या अनुभवी गोलंदाजाचा संघात समावेश

121

टी-२० वर्ल्डकपमधून दुखापतीमुळे भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली. बुमराहच्या जागी आता भारतीय संघात मोहम्मद शमीला संधी दिली जाणार आहे. बुमराह टी-२० वर्ल्डकप खेळू शकणार नाही हे भारतीय संघासाठी धक्कादायक आहे. बुमराह संघाबाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? दोन्ही मार्गावर असणार मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

बुमराहच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि शार्दूल ठाकूर यांची नावे चर्चेत होते. अखेर निवड समितीने अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीची टी-२० वर्ल्डकपसाठी निवड केली आहे. टी-२० वर्ल्डकपच्याआधी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरूद्ध सराव सामने खेळावे लागणार आहेत.

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहूल ( उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी

भारताचे वेळापत्रक

  • २३ ऑक्टोबर – भारत विरूद्ध पाकिस्तान दुपारी १.३० वाजता मेलबर्न
  • २७ ऑक्टोबर – ग्रुप ए रनर – अपविरुद्ध दुपारी १२.३० वाजता सिडनी
  • ३० ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी ४.३० वाजता पर्थ
  • २ नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश दुपारी १.३० वाजता एलिलेड
  • ६ नोव्हेंबर – ग्रुप ही विजेत्याविरुद्ध दुपारी १.३० वाजता मेलबर्न
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.