अवामी लीगचे १ हजारहून अधिक नेते आणि कार्यकर्ते मारले गेले आहेत, त्यांची घरे लुटली गेली आहेत. विद्यार्थी आणि पोलीस यांची हत्या, जाळपोळ आणि अत्याचार यांमागे सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारचा हात आहे. आपल्या देशाचे नुकसान करणारे मारेकरी आणि षड्यंत्रकर्ते यांना कायद्यानुसार जबाबदार धरले जाईल. ज्याप्रमाणे आम्ही युद्ध गुन्हेगारांवर कारवाई केली, त्याचप्रमाणे आजच्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल. कायद्यापासून कुणीही सुटू शकत नाही. आपल्या देशाच्या इतिहासातील हा काळा अध्याय (bangladesh unrest) कायमचा टिकणार नाही, असे उद्गार बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी काढले आहेत. त्या लंडन येथील अवामी लीगच्या समर्थकांच्या मेळाव्याला ऑनलाईन मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : जसप्रीत बुमराह खरंच तंदुरुस्त आहे का ?)
शेख हसीना (Sheikh Hasina) पुढे म्हणाल्या की, बांगलादेश (Hindus in Bangladesh) आता ‘फॅसिस्ट’ राजवटीच्या विळख्यात सापडला आहे, जिथे लोकांचे लोकशाही हक्क संपुष्टात आले आहेत. महंमद युनूस (Mohammed Yunus) आणि त्यांचे सहकारी हे देशातील जुलै-ऑगस्टमधील अशांततेचे मुख्य सूत्रधार आहेत. बांगलादेशाच्या संसदेवर आक्रमण करणारे आणि आतंकवादी यांची या सरकारने सुटका केली. या सूत्रावरून सरकारचा देशात अशांतता पसरवण्यातील सहभाग सिद्ध होतो.
युनूस यांच्या हालचालींवर आयोगाचे नियंत्रण नाही
भ्रष्टाचारविरोधी आयोगाने युनूस आणि त्यांची संस्था असलेल्या ग्रामीण बँकेशी संबंधित आर्थिक अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. युनूस यांच्या हालचालींवर आयोगाचे कोणतेही नियंत्रण नाही, असा आरोपही शेख हसीना यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community