लोकसंख्या (Population) घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्येबद्दल विज्ञान सांगते की, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) २.१ च्या खाली जाते. तेव्हा कोणतीही समस्या नसली तरी तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. अशाप्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले आहेत, असे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. नागपुरातील कठाळे कुलच्या बैठकीत ते बोलत होते.
(हेही वाचा : Accident News : कोल्हापूरातील तिलारी घाटात मिनी बसला अपघात; बसमध्ये २० प्रवासी …)
सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, आपल्या देशाचे लोकसंख्या (Population) धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये तयार करण्यात आले. ज्यामध्ये लोकसंख्या प्रजनन दर २.१ च्या खाली जाऊ नये यावर भर देण्यात आला होता. मात्र आम्हाला दोन किंवा तीन अपत्ये हवी आहेत. ज्यामुळे आपला समाज टिकेल. त्यावेळी भागवतांनी (Mohan Bhagwat) नवविवाहित जोडप्यांनी किमान २ ते ३ मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. (Mohan Bhagwat)
हेही पाहा :