उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यात किठौर क्षेत्रात दि. १३ डिसेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली. किठौरमध्ये एका तरुणीने शाळेतून घरी येणाऱ्या तरुणीचा विनयभंग (Molestation Case ) केला. तसेच पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीचे नाव महबूब आहे. तरुणीने आरडाओरडा सुरु केल्यानंतर लोक घटनास्थळी जमा झाले. मात्र लोक जमा होईपर्यंत महबूब (Mehboob) पीडितेला धमकी देऊन निघून गेला होता.
( हेही वाचा : दादरमधील मंदिरप्रकरणी Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही…)
तरुणीचा विनयभंग आणि मारहाण
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी ९ वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. दि. १३ डिसेंबर रोजी शाळा सुटल्यावर पीडित तरुणी घरी परतत होती. तेव्हा महबूबने पीडितेचा रस्ता अडवला. पीडितेने विरोध (Molestation Case ) केल्यावर महबूबने तिचे केस पकडत मारहाण करण्यास सुरु केली. तसेच पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडाओरडा केल्यावर लोक घटनास्थळी आले. ज्यानंतर महबूब (Mehboob) तिथून पळून गेला. घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पीडितेच्या वडीलांनी किठौर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून रात्री १० वाजता महबूबला (Mehboob) गावाबाहेर पोलिसांनी घेरले. (Molestation Case )
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर पोलिस जेव्हा महबूबला अटक मेडिकल टेस्टसाठी घेऊन जात होते, तेव्हा पोलिस हवालदाराची बंदूक घेऊन महबूबने (Mehboob) फरार होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीतून उडी मारून महबूब झाडीमध्ये जाऊन लपला. पोलिसांनी लगेच टॉर्चच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी महबूबने (Mehboob) पोलिसांवर गोळी चालवली. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यावेळी आरोपी महबूब जखमी झाल. पोलिस अधीक्षक डॉ. राकेश कुमार मिश्र यांनी सांगितले की, आरोपी महबूब (Mehboob) याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला दि. १४ डिसेंबर रोजी न्यायालयात नेले जाईल. (Molestation Case )
याप्रकरणी पीडितेला बेदम मारहाण केल्यामुळे गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडितेने सांगितले की, महबूब (Mehboob) बरेच दिवस आपला पाठलाग करत होता. तसेच रस्त्यात अडवून छेडछाड (Molestation Case ) करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही पीडिता म्हणाली. मात्र महबूब आपली हद्द ओलांडेल असे कधीही वाटले नव्हते असे ही पीडिता म्हणाली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community