ग्रंथपालाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; ग्रंथपालाला अटक

लोअर परळ येथील एका शाळेतील ग्रंथपालाने १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी, ६ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून ग्रंथपालास अटक केली आहे.

विद्यार्थिनीने थेट घर गाठले

लोअर परळ या ठिकाणी असलेल्या शाळेत इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षांची विद्यार्थिनी गुरुवारी अभ्यास करण्यासाठी शाळेतील लायब्ररीत बसलेली होती. त्यावेळी लायब्ररीत तिच्या आणि ग्रंथपाल या दोघांशिवाय तिसरे कोणीही नव्हते, विद्यार्थीनी ही अभ्यासात मग्न असतांना ग्रंथपालाने त्याचा फायदा उचलत या विद्यार्थिनीच्या पाठीमागून तिचा विनयभंग केला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने लायब्ररीच्या बाहेर धाव घेत थेट घर गाठले आणि झालेला प्रकार घरी येऊन आईला सांगितला. मुलीच्या आईने शाळेत ग्रंथपाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ग्रंथपालाला अटक केली असल्याची माहिती वपोनि. सुनील चंद्रमोरे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here