दोन तासांसाठी ४३ ठिकाणी बत्ती गुल! आपल्याकडे वीज असणार का? तपासून घ्या

165

महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाइनच्या दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील तब्बल ४३ ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणार आहे. नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये सोमवारी, ११ एप्रिल रोजी पहाटे चार ते सकाळी सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास महापारेषणकडून दोन तासात हे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे.

महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर अतिउच्च दाब उपकेंद्रादरम्यान टॉवर लाइनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही १९ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरूपात सुरु ठेवण्यात येणार आहे. या परिसरातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर या संदर्भात ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

(हेही वाचा पाकिस्तानच्या होणा-या पंतप्रधानांच्या बायका किती?)

कोणत्या भागात वीज खंडीत होणार? 

गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पिटल परिसर, विमाननगर, रोहन मिथिला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाउसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.