शनिवारी, १७ जुलै रोजी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मुंबईची अक्षरशः तुंबई केली. त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसर पाण्याखाली गेला होता. जरी सोमवारी, १९ जुलै रोजी पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली तरी काही तासाने पुन्हा एकदा पावसाने बॅटिंग सुरु केली. मुंबईसह महामुंबईत पावसाचे गडद ढग जमा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईसह महामुंबई परिसराला सोमवारीही धोक्याचा इशारा दिला आहे.
19 Jul, 8.45 am
Entire Konkan line including Mumbai Thane covered up with very deep clouds alongwith adjoining Arabian sea as seen in latest satellite obs.
Thane Palghar Ratnagiri recorded extremely heavy fall in last 24 hrs with some huge numbers
Will share the obs
Follow IMD pic.twitter.com/qYDEqMebUF— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2021
पावसामुळे रविवार मुंबईसाठी ‘घात’वर ठरला. चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या कोसळणारा पाऊस महामुंबईसाठी धोक्याचा इशारा देणारा आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले, घराघरांमध्ये पाणी शिरले, रस्ते पाण्याखाली गेले, तसेच दरडी कोसळल्या. त्यामुळे रविवारच्या पावसाच्या आठवणीने घाबरून गेलेल्या महामुंबईतील नागरिकांना सोमवारीही रौद्र पहावे लागणार आहे. तशी सोमवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली आहे.
महामुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगांचे साम्राज्य
हवामान खात्याने सॅटेलाईटद्वारे घेतलेली ताजी छायाचित्रे प्रसिद्ध केली असून अरबी समुद्रावर पावसाच्या ढगांचे अक्षरशः साम्राज्य जमा झाले असून सोमवारीही या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत मुसळधार तर ठाणे, नवी मुंबई, रायगड येथे अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Join Our WhatsApp Community