‘मंकीपॉक्स’ला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित! जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली.

जगभरात मंकीपॉक्स विषाणूच्या झपाट्याने पसरणाऱ्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.  70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात मंकीपॉक्सच्या 14,000 रुग्णसंख्येची पुष्टी केली आहे. तर आफ्रिकेत मंकीपॉक्समुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  2007 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर केलेली सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.

(हेही वाचा शिंदे गटाला मनसेत विलीन व्हायचे असेल तर स्वागतच – राज ठाकरे)

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here