जगभरात कोविडने थैमान घातल्यानंतर अनेक देशांना यांचा फटका बसला. त्यामुळे प्राण्यांपासून माणसांना होऊ शकणाऱ्या आजारांबद्दल संशोधक सतर्क झाले आहेत. एकीकडे भारतात मंकी फॉक्स, झिका हे रोग डोकंवर काढत असताना हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका नव्या आजाराने डोकंवर काढलं आहे. हाँगकाँगमधील एका प्राणीसंग्रहालयात माकडांना नव्या प्रकारच्या आजाराने डोकेवर काढले आहे. यामुळे ११ माकडांचा मृत्यू झाला आहे. (Hong Kong)
( हेही वाचा : Mahim Assembly Constituency मधून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास सरवणकर आणि सावंत यांचा असाही फायदा!)
हाँगकाँगमधील (Hong Kong) शेती, मत्सपालन आणि संवर्धन विभागाने मृत माकडांच्या शरीराचा अभ्यास सुरु केला असून विशिष्ट प्रकारच्या बँक्टेरियामुळे हा आजार झाल्याचे निष्पण झाले आहे. आजूबाजूच्या मातीतून माकडांना हा आजार झाल्याचे संशोधकांचा तर्क आहे. तसेच या बँक्टेरियामुळे आजार होण्याचा आणि लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी सात दिवसांचा आहे. या बँक्टेरियाचा संसर्ग माणूस आणि प्राण्यांनाही होऊ शकतो. मात्र अद्याप प्राण्यांपासून माणसांना हा आजार झाल्याचे निर्देशनात आले नाही. परंतु नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Hong Kong)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community