मोनोरेलच्या नियमित देखभाल दुरुस्तीअंतर्गत महत्त्वाच्या स्थापत्य दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (२४ मार्च) सकाळी वडाळा आगार स्थानक (Wadala station) ते चेंबूर स्थानकादरम्यानची मोनो सेवा बंद राहणार आहे, तर रात्री ८ नंतर १ तासांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. संत गाडगे महाराज चौक ते वडाळा आगार या स्थानकादरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार आहे. या फेऱ्या १८ मिनिटांच्या अंतराने सुरू राहणार असून रविवारी मोनोच्या एकूण ११४ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे. (Mono Service)
त्याचप्रमाणे सोमवारी (२५ मार्च) वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान (Chembur) १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत, तर वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानकादरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. याप्रमाणे सोमवारी मोनोच्या एकूण १४७ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे.
विनाव्यत्यय प्रवास करण्यासाठी
मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना विनाव्यत्यय प्रवास करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीला प्राधान्य दिले जाते. मोनोरेलची नियमित देखभाल दुरुस्तीची कामे पार पाडत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक व्हावा यासाठी मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान होणार व्यत्यय टाळणे आवश्यक आहे. यासाठी देखभाल दुरुस्तीचे काम हे सुट्टीच्या दिवशी हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२६) मोनोरेलची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. प्रवाशांनी मोनोरेल सेवेची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, अशी माहिती मुंबई मोनोरेल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही पहा –