आनंदाची बातमी! पुढील ४८ तासांत मान्सून धडकणार!

145

आजवरच्या सर्वाधिकार तापमानाची झळ सहन केल्यानंतर आता काहीशी आनंदाची बातमी येत आहे. यंदाचा मान्सून भारतात १० दिवस आधीच हजेरी लावणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण पुढच्या ४८ तासांत मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात धडकणार आहे.

(हेही वाचा केतकी चितळेचा राज ठाकरेंनीही केला निषेध! म्हणाले, ही मानसिक विकृती!)

केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होणार

२७ मेपर्यंत मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल आणि पहिला पाऊस केरळमध्ये पडेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर केरळच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे बहुस्तरीय मध्यम ढग दाटले आहेत. तर गोवा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांवरही ढगांची चादर पाहायला मिळत आहे. हिंद महासागरातून भारतात येणारे नैऋत्य वारे, ज्याला मान्सून म्हणतात. हे वारे वाहत भारतात पाऊस घेऊन येतात. भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नेहमी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. पण यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन सामान्य तारखेच्या काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे. यावर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन २७ मे रोजी ± ४ दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.