आला पावसाळा, कोकणच्या राणी वेग मंदावला! कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक

पावसाळा आला की दऱ्या खोऱ्यातून वाट काढत धावणाऱ्या कोकण रेल्वेचा वेग मंदावत असतो. यंदाही मान्सून कोकणात दाखल झाला आणि लगोलग १० जून २०२२ पासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. हे बदललेले वेळापत्रक ३१ ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या या कोकण रेल्वे स्थानकावर एक ते दोन तास लवकर येणार आहेत. पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वेने हा बदल केला आहे. त्यामुळे गाड्याच्या वेगावार मर्यादा येणार आहे.  पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गांवर दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे यावर उपाय म्हणून या मार्गावर कोकण रेल्वेचा वेग मंदावण्यात येत असतो. प्रवाशांच्या सुरक्षितेमुळे रेल्वेने वेगावर आणि वेळेवर नियंत्रण आणले असून गाड्यांच्या पावसाळी वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्याच्या प्रत्येक स्थानकावर येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत बदले केला आहे.

असे असेल वेळापत्रक! 

  • सावंतवाडी स्थानकातून सुटणारी तुतारी एक्सप्रेस सायंकाळी 5.55 वाजता सुटणार आहे. ही गाडी कुडाळ येते 6.16 कणकवली 6.48 वैभववाडीत सायंकाळी 7.22 वाजता पोहचणार आहे.
  • सावंतवाडीहून दिव्याकडे जाणारी दिवा पॅसेंजर गाडी सावंतवाडी येथून सकाळी 8.25 वाजता सुटून कुडाळ येथे 8.47, कणकवली 9.21 आणि वैभववाडीला सकाळी 10 वाजता पोहचणार आहे.
  • मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडीला सायंकाळी 6.30 वाजता येईल. कुडाळ 6.50, कणकवली 7.20 तर वैभववाडीला 7.58 वाजाता येईल. मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडीला दुपारी 1.18 वाजाता, कुडाळ 1.40 वाजात तर कणकवलीत 2.10 वाजाता पोहचेल.
  • मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी येथे सकाळी 10.4 वाजता, कुडाळा 10.24 वाजता, कणकवली 11.02 तर वैभववाडी येथे 11.32 वाजता सुटेल. कणकवली स्थानकावर पहाटे येणारी मंगला एक्सप्रेस उद्यापासून पहाटे 5.02 वाजता पोहचेल तर ओका एक्सप्रेस दुपारी 1.02 वाजता दर शनिवारी आणि गुरूवारी थांबेल.
  • मेंगलोर एक्सप्रेस कणकवली स्थानकावर मध्यरात्री 12.08 वाजता सुटणार आहे. कुडाळ स्थानकावर थांबणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस रात्री 8.50 वाजता सुटेल. कोचिवली ते इंदोर ही गाडी कुडाळा स्थानकावर पहाटे 4.40 वाजता सुटेल तर नियमित धावणारी नेत्रावती एक्सप्रेस पहाटे 5.32 वाजता सुटणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here