भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार हजेरी लावली. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि नागपूर यांनी पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची कशी स्थिती असेल, या संदर्भात अॅलर्ट जारी केले आहेत.
25 Jun: Heavy rainfall alerts by IMD Mumbai and Nagpur for coming 4 days.
5th day there are warnings for parts of Konkan and Madhya Mah@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/x2usdsmQPZ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 25, 2023
भारतीय हवामान विभागानं २६ ते २८ जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार २६ जूनला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर , सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )
२७ जूनला कशी असेल पावसाची स्थिती?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
२८ जूनला विदर्भात पावसाचा जोर कमी
हवामान विभागानं जारी केलेल्या अॅलर्टनुसार २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community