देशात सर्वत्र उष्णतेची लाट असतांना सगळ्यांचे मान्सूनकडे (Monsoon) लक्ष लागले आहे. हवामान खात्याने यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार ४ जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता; मात्र आता पुन्हा एकदा मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस (Monsoon) लांबण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं. पुढील २४ तासांत त्या प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे. मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावर याचा परिणाम झाला आहे.
A cyclonic circulation lies over Southeast Arabian Sea and extends upto 5.8 km above mean sea level. Under its influence a Low Pressure Area is very likely to form over the same region during next 24 hours.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 5, 2023
(हेही वाचा – water cut : नवी मुंबईमध्ये ‘या’ दिवशी होणार तब्बल १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
मुंबई हवामान विभागाने या संदर्भात एक ट्विट करत सांगितलं की, दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर (Monsoon) चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.
वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला
साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून (Monsoon) भारतात दाखल होतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचणार आहे. मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झालं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community