गेल्या पाच दिवसांपासून श्रीलंकेच्या वेशीवर अडकलेला मॉन्सून अखेर श्रीलंकेत पोहोचला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आगमन करताच अर्धी श्रीलंका काबीज केली. मात्र भारतीय वेधशाळेच्या 27 मे रोजी केरळातील आगमनाला नैऋत्य मोसमी वारे जवळपास खोच देत असल्याचे दिसून येत आहे.
मॉन्सूनच्या केरळवरील आगमनावर लक्ष
मॉन्सून केरळच्या अपेक्षित वेशीपर्यंतही आलेला नाही. परिणामी अरबी समुद्रातील मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस 28 मे उजाडेल, असा नवा अंदाज भारतीय वेधशाळेने दिला आहे. सध्या केरळात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पाऊस सुरु आहे. लक्षद्विपमध्येही केरळसारखेच मॉन्सूनच्या आगमनाला अनुकूल वातावरण दिसून येत आहे. केरळनजीकच्या राज्यातही पूर्वमोसमी पाऊस सुरु आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या केरळवरील आगमनावर लक्ष ठेवून असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली.
( हेही वाचा: Ravi Shastri B’Day Special: क्रिकेट विश्वातील एक ‘अष्टपैलू’ व्यक्तिमत्त्व )