Monsoon Arrival : मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर… कधी संपणार प्रतीक्षा ?

Monsoon Arrival : नैऋत्य मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता.

473
Monsoon Arrival : मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर... कधी संपणार प्रतीक्षा ?
Monsoon Arrival : मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर... कधी संपणार प्रतीक्षा ?

मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Arrival) तारीख समोर आली आहे. नैऋत्य मान्सून यंदा काही दिवस लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – North West LS Constituency कोणीही जिंकले तरी, विजय शिवसेनेचाच!)

मान्सून 106 टक्के पडणार

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 15 एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली होती. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला होता. आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक बरसणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला

यंदा मान्सून सामान्य, तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला रहाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची (La Nino) परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल. (Monsoon Arrival)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.