देशाच्या वायव्य भागातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केल्याची घोषणा केंद्रीय वेधशाळेने केली. राजस्थान राज्यातून खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातमधील नलिया भागातून मान्सून माघारी फिरल्याचे वेधशाळेने जाहीर केले. साधारणत राजस्थान राज्यातून 17 सप्टेंबरला मान्सून माघारी परतायला सुरुवात होते. यंदा तीन दिवस उशिराने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
( हेही वाचा : आता बुकिंगची नाटकं बंद : महापालिकेच्या नाट्यगृहात प्रयोगांचे ऑनलाइन बुकिंग)
देशात सध्या मध्य भारतात पावसाच्या सरींचा जोर वाढला आहे. राज्याच्या शेजारील तेलंगणा राज्यात सतत पावसाची हजेरी राहील. त्यासह छत्तीसगढ आणि राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस असेल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने जाहीर केला. कोकणात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community