Monsoon Disease : महापालिकेची आहे ही तयारी!

76
Monsoon Disease : महापालिकेची आहे ही तयारी!

मुंबईत पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आणि खासगी प्रयोगशाळेच्या ठिकाणी नियमितपणे रूग्णसंख्या अद्ययावत करण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या २० हून ८०० इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे मानव-डास साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक रूग्णसंख्या नोंदवली जाणे गरजेचे आहे. म्हणूनच वेळीच सर्वेक्षण, रूग्ण शोधणे, विलगीकरण आणि उपचार हे सूत्र वापरण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले. (Monsoon Disease)

विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ३ जुलै २०२४ रोजी पार पडली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. नीलम अंद्राडे, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आणखी एका बैठकीमध्ये विभागातील सहाय्यक आयुक्तांनाही पावसाळाजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. (Monsoon Disease)

(हेही वाचा – BMC Hospital : पावसाळी आजारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काय आहे व्यवस्था)

आगामी तीन महिने आव्हानात्मक

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, डाक विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. (Monsoon Disease)

समाजासाठी अतिशय घातक अशा डेंगी, मलेरिया यासारख्या आजारांवर प्रतिबंधासाठी विविध यंत्रणांच्या सहाय्याने सामूहिक पद्धतीने योगदान गरजेचे आहे. पावसाळ्यातील आगामी तीन महिने हे आव्हानात्मक असणार आहेत. डासांची उत्पत्ती स्थाने शोधून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या पद्धतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. अविरतपणे एकत्र सहभागातून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान देण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी यानिमित्ताने केले. (Monsoon Disease)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.