मान्सूनने रविवारी, २५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) याची माहिती दिली. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती दिली. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
(हेही वाचा Jawaharalal Nehru: जवाहरलाल नेहरूंमुळे भारताचा फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळाला होता अनवाणी )
मुंबईसह दिल्लीतही मान्सून दाखल
मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होत असतो, तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. परवापासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी हवामान खात्याने मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे.
Join Our WhatsApp Community