भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळ (Monsoon in Kerala) आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागानं यापूर्वी मान्सून (Monsoon) केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, एक दिवस अगोदरच मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झाला आहे. (Monsoon)
दरम्यान, गतवर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला होता. मान्सूनचा पाऊस गेल्यावर्षी उशिरानं दाखल झाला होता. गेल्या मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाल्यानं भारतातील शेतीला मोठा फटका देखील बसला होता. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होतो. आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पोहोचतो. (Monsoon)
मान्सून दाखल झाला हे कसे ओळखतात?
भारतीय हवामान विभाग मान्सून (Monsoon) दाखल झाला हे कोणत्या निकषांच्या आधारे ठरवलं जातं, हे अनेकदा बऱ्याच जणांना माहिती नसतं. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात माहिती दिली होती. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी मान्सून दाखल झाला याबाबतचे निकष सांगितले होते. (Monsoon)
केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे निकष:
1.पाऊस:14 स्टेशन्स पैकी, 60% स्टेशन्सने 2 दिवस 2.5 mm किंवा जास्त पावसांची नोंद करणे (10मे नंतर ),तर दुसऱ्या दिवशी
2.वारे फील्ड: वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे, गती 15-20kts
3.आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2
ते 14 स्टेशन्स कोणते?
केरळमधील 14 स्टेशन्सवर 10 मे नंतर 60 टक्के स्टेशन्सवर 2 दिवस 2.5 mm पाऊस होणं आवश्यक असतं. या 14 स्टेशन्समध्ये मिनिकॉय, अमिनी, थिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टयम, कोची, थ्रिसूर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू, मंगलोर यांचा समावेश आहे. (Monsoon)
भारतीय हवामान विभागाच्यावतीनं नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सरासरीच्या 106 टक्के पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो. नैऋत्य पाऊस मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा (>LPA च्या 106 %). जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायव्य भारतात सामान्य (LPAच्या 92-108%), ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (LPAच्या <94%), मान्सून कोर झोन(MCZ)वर सामान्यपेक्षा जास्त (> LPAच्या 106%). होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (Monsoon)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community