Monsoon in Mumbai 2024 : मुंबईत बदलतोय मान्सूनचा पॅटर्न; काय म्हणतात हवामान तज्ज्ञ

Monsoon in Mumbai 2024 : यंदा जूनच्या शेवटी जुलैमध्ये २ वेळा, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी एकदा, असे किमान ४ वेळा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान आहे.

1108
Monsoon in Mumbai 2024 : मुंबईत बदलतोय मान्सूनचा पॅटर्न; काय म्हणतात हवामान तज्ज्ञ
Monsoon in Mumbai 2024 : मुंबईत बदलतोय मान्सूनचा पॅटर्न; काय म्हणतात हवामान तज्ज्ञ

मुंबईत एकूण सरासरीच्या ४० टक्के पाऊस हा पावसाळ्यातील दोन ते तीन दिवसांत कोसळतो. तसेच दरवर्षी सहा वेळा मुसळधार, पाच वेळा अतिमुसळधार पाऊस पडतो. तसेच वर्षांतून चार दिवस अतिवृष्टी होते. मुंबईत समुद्र सपाटीच्या तुलनेत खाली असलेल्या परिसरांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. (Monsoon in Mumbai 2024)

(हेही वाचा – Western Railwayची भन्नाट आयडिया! आता इंडिकेटर शोधण्याची गरज नाही)

गेल्या काही वर्षांत मान्सून आपला पॅटर्न बदलत आहे. (Change In Weather) त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा जूनच्या शेवटी जुलैमध्ये २ वेळा, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी एकदा, असे किमान ४ वेळा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान आहे. या चार ते पाच पावसांमुळे मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामानातील बदलावर मोठ्या पावसाचे गणित विसंबून असते. त्यामुळे मान्सून जसा पुढे सरकेल, तसे चित्र आणखी स्पष्ट होईल, याकडेही हवामान अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.

काय आहे यंदाची वार्षिक सरासरी

जून
१. कुलाबा :२२१.३ सेमी
२. सांताक्रुझ :२५०.२ सेमी

जुलै
१. कुलाबा-७६.९ सेमी (सरासरी)
२. सांताक्रुझ- ९२ सेमी (सरासरी)

यंदा ४ ते ७, १८ ते २१ व ३१ जुलैदरम्यान अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्ट
१. कुलाबा – ४७.२ सेमी (सरासरी)
२. सांताक्रुझ- ५६ सेमी (सरासरी)

यंदा १ ते ४, १५ ते १९, २९, ३०, ३१ ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता आहे.

सप्टेंबर
१. कुलाबा- ३५.६ सेमी (सरासरी)
२. सांताक्रुझ- ३८.४ सेमी (सरासरी)

यंदा १, १२ ते १६, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Monsoon in Mumbai 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.