Monsoon : मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, जाणून घ्या राज्यात केव्हा बरसणार मान्सून सरी?

क्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे.

181
Monsoon : मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, जाणून घ्या राज्यात केव्हा बरसणार मान्सून सरी?

केरळमध्ये दाखल झालेला पाऊस (Monsoon) हळूहळू पुढे सरकत आहे. महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा लागली असून ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोव्यासह देशातील काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवीन सॅटेलाईट फोटोंनुसार, आज म्हणजेच ११ जून सकाळी ८.४५ वाजता केरळपासून गोवा आणि दक्षिण कोकणातील काही भागापर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दिसून येत आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे की, चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सूनसाठी (Monsoon) अनुकुल आहे.

(हेही वाचा – Biporjoy Cyclone : मुंबईच्या किनाऱ्यावर धुळीचे प्रचंड लोट; समुद्रही खवळलेला)

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता

जून १३ दरम्यान महाराष्ट्रात तर १६ जूनपर्यंत मुंबईत मान्सून (Monsoon) दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या (Monsoon) आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.