मुंबईला स्वाईन फ्लूचा विळखा; इतर पावसाळी आजार नियंत्रणात

मुंबईत गेल्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे डेंग्यू आणि लॅप्टोच्या रुग्णांची वाढलेली संख्या आता आटोक्यात येत आहे. मलेरिया, गेस्ट्रॉ तसेच हेपेटायटीस या आजारांचे रुग्णही आता नियंत्रणात येत आहे. परंतु मुंबईत स्वाईन फ्लूचे 80 रुग्ण सापडल्याने, राज्य आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक लस कधी येईल, याची प्रतीक्षा मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला आहे. गेल्या महिन्याभरापासून पालिका आरोग्य खाते मुंबईकरांना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या तयारीत आहे.
7 ऑगस्टच्या पालिका आरोग्य विभागाच्या अहवालात, मलेरियाचे 218 रुग्ण आढळले. लॅप्टो, डेंग्यू, गेस्ट्रॉ, हेपटायटीस या आजरांच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र गेल्या आठवड्यातील अहवालाच्या तुलनेत, स्वाईन फ्लू वगळता सर्व आजाराचे रुग्ण घटल्याचे दिसून आले.
  • आजार –  31 जुलै  -7 ऑगस्ट
  • मलेरिया –   563  – 218
  • लॅप्टो –   65   – 13
  • डेंग्यू –   61    – 27
  • गेस्ट्रॉ –  679  – 119
  • हेपेटायटीस –  65  – 16
  • चिकनगुनिया –  2  – 1
  • स्वाईन फ्लू –  105   – 80

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here